मुंबई गोवा महामार्गावर अपघात; 2 जखमी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 24, 2015 12:08 PM IST

मुंबई गोवा महामार्गावर अपघात; 2 जखमी

pune-goa accident

24 मे : मुंबई - गोवा महामार्गावर पेण - हमरापूर फाट्याजवळ आज सकाळी दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. सकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली.

पेण - हमरापूर फाट्याजवळ दोन ट्रकमध्ये भीषण धडक झाली. या धडकेत सिलेंडर वाहून नेणार्‍या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. सिलेंडरचे तुकडे सुमारे 100 फुटांपर्यंत उडाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातात दोन जण जखमी झाले.

या अपघातामुळे महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली असून मुंबईकडे येणारी वाहतूक पेण - खोपोली मार्गे वळवण्यात आली आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2015 11:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...