कॉम्रेड गोविंद पानसरेंचे मारेकरी कर्नाटकातले ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 23, 2015 08:04 PM IST

pansare 1223 मे : कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी कर्नाटकमध्ये असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एवढंच नाहीतर मारेकर्‍यांचे रेखाचित्रही तयार करण्यात आले आहे अशी माहिती राज्य सरकारच्या विश्वसनीय सूत्रांची आयबीएन लोकमत दिलीये. मात्र, अजूनही पोलिसांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पोलीस दल सर्व शक्यता तपासून पाहत आहे. वेगवेगळ्या थिअरींवर पोलीस काम करत आहे असंही कळतंय.

कामगारासाठी आयुष्य वेचणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील सागरमळा परिसरात त्यांच्या राहत्या घराजवळ भ्याड हल्ला झाला होता. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निग वॉक करून घरी परतत होते त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी दुचारीवरून येऊन त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या होत्या. पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये उपचार करण्यात आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी उपचारादम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला. गेल्या पाच महिन्यांपासून पोलीस पानसरे यांच्या मारेकर्‍यांचा शोध घेत आहे. आज विश्वसनीय सूत्रांनी आयबीएन लोकमतला माहिती दिली असून गोविंद पानसरेंचे मारेकर कर्नाटकातले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2015 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...