काही नेते फक्त नाईटलाईफसाठी लढता, शेलारांचा सेनेच्या युवराजांना टोला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 21, 2015 04:47 PM IST

काही नेते फक्त नाईटलाईफसाठी लढता, शेलारांचा सेनेच्या युवराजांना टोला

shelar on aditya21 मे : भाजप आणि शिवसेनेमध्ये सर्व चांगलं चाललंय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच म्हटलं. पण, आज (गुरुवारी) मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मात्र पुन्हा एकदा वादाला तोंड फोडलंय. काही नेते फक्त नाईट लाईफसाठी लढत असतांना, आमचे मुख्यमंत्री मात्र पंढरपूरच्या मंदिरात रात्रीही दर्शन घेता यावं म्हणून प्रयत्न करतायत असं टि्वट करून आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि आदित्य ठाकरेंवर टीका केलीये.

आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी रात्री नालेसफाई मोहिमेची पाहणी केली होती. नालेसफाई मोहिमेचं काम पूर्ण होईल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला होता. तर दुसरीकडे आशिष शेलार यांनीही मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी केली. त्यावरून सुद्धा त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली होती. 60 टक्के नालेसफाई झाल्याचं शिवसेनेनं म्हटलं होतं. पण, नालेसफाईचं काम समाधानकारक नाही, अशी टीका शेलार यांनी केली होती. नालेसफाईमध्ये कंत्राटदारांच्या कामामध्ये पारदर्शकता नाही असा आरोपच शेलार यांनी केला होता.

 

 

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2015 04:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...