सिद्धीविनायक मंदिराला ISO प्रमाणपत्र

सिद्धीविनायक मंदिराला ISO प्रमाणपत्र

  • Share this:

siddhivinayak

20 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिद्धीविनायक न्यासाला आज (बुधवारी) आययएसओचं प्रमाणपत्र देण्यात आलं. ब्रिटिश स्टँडर्ड इंस्टीट्यूट, एर्थात बीएसआयचे सिद्धीविनायक न्यासाला उत्कृष्ठ व्यवस्थापनासाठी हे प्रमाणपत्र देण्यात आलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिद्धीविनायकाची पूजा केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र बहाल करण्यात आलं. ISO प्रमाणपत्र मिळवणारं हे पहिले शासन नियंत्रित मंदीर आहे.

सिद्धीविनायक मंदिरात रोज हजारो भक्त दर्शन घेतात. उत्कृष्ट नियोजन, सामाजिक कार्य तसेच आरोग्य आणि शिक्षण संदर्भात केलेली कामं यांच्या निकषावर सिद्धीविनायक न्यासाला हे प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: May 20, 2015, 2:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading