अखेर महायुतीच्या घटकपक्षांना समन्वय समितीत स्थान

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 19, 2015 05:26 PM IST

mahayuti_raju shetty19 मे : सत्तेत वाटा न मिळाल्याने नाराज असणार्‍या महायुतीतल्या घटक पक्षांना आता खूश करण्याचे प्रयत्न भाजप-शिवसेनेनं सुरू केले आहे. भाजप शिवसेनेच्या समन्वय समितीमध्ये घटक पक्षांनाही स्थान देण्यात येणार असल्याचं युतीकडून जाहीर करण्यात आलंय. याबद्दल लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर घटकपक्षांनी भाजपसोबत घरोबा केला होता. पण, सत्तेच्या सारीपाटावर कधी काय घडू शकतं याच उदाहरणाप्रमाणे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप सत्तेसाठी एकत्र आले. भाजप आणि शिवसेनेचा संसार सुरू झाला खरा पण, अंतर्गत काही वाद मिटले नाही. 'सामना'तून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणं सुरूच होते. एवढंच नाहीतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीरपणे टीका-टिप्पणी करत होते. यावर तोडगा म्हणून समन्वय समिती स्थापन करण्यात आली. पण, या समितीत घटक पक्षांचा समावेशच करण्यात आला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या घटक पक्षांच्या नेत्यांनी निर्वाणीचा इशारा दिला होता. अखेरीस आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले यांचा समन्वय समितीत समावेश करण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दानवे, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांची बैठक झाली. त्यादरम्यान हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. लवकरच याची अधिकृत घोषणा होणार आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यातच घटकपक्षांनी सत्तेत 10 टक्के वाटा द्यावा अशी मागणी केली होती. पण, भाजपने नकार दिला होता. घटकपक्षांच्या मनधरणीसाठी भाजपकडून आता समन्वयाचा तोडगा काढण्यात आला असंच दिसतंय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2015 05:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...