पंतप्रधान मोदींच्या दक्षिण कोरिया दौर्‍याचा आज शेवटचा दिवस

पंतप्रधान मोदींच्या दक्षिण कोरिया दौर्‍याचा आज शेवटचा दिवस

  • Share this:

pm korea19 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण कोरियाच्या दौर्‍यावर असून आज त्यांच्या दौर्‍याचा शेवटचा दिवस आहे. सेऊलमध्ये त्यांनी सहावी एशियन लिडर्स कॉन्फरन्समध्ये हजेरी लावली. त्यानंतर मोदी यांनी दक्षिण कोरियाच्या अध्यक्ष पार्क गेऊन ह्ये यांच्यासह सीईओ फोरममध्ये हजेरी लावली. यावेळी मोदी सीईओ फोरमला संबोधित करणार आहे.

सॅमसंग , ह्युंदाई आणि एल जी या नामांकित कोरियन कंपन्याच्या सीईओंशी मोदी चर्चा करतील. त्यानंतर गिम्हे इथं असलेल्या राणी हू हिच्या स्मारकाला ते भेट देणार आहेत.

त्याअगोदर, पंतप्रधान मोदींनी सकाळी च्योन-ग्ये-च्योन या सेऊलमधल्या ओढ्याला भेट दिली. शहरातच्या मधून हा ओढा वाहतो, आणि सेऊलमधलं हे खास आकर्षण आहे. नागरी विकास क्षेत्रात हे एक उत्तम उदाहरण मानलं जातं. यावेळी उपस्थित भारतीयांनी जल्लोषात केलं मोदींचं स्वागत केलं. मोदींचे फोटो काढण्यासाठी भारतीयांची एकच झुंबड उडाली. यावेळी उपस्थित असलेल्या लहान मुलांनी मोदींच्या स्वाक्षर्‍या घेतल्यात.

Follow @ibnlokmattv

First Published: May 19, 2015 09:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading