उद्धव ठाकरेंनी घेतली शहिद अमीन कुटुंबीयांची भेट

उद्धव ठाकरेंनी घेतली शहिद अमीन कुटुंबीयांची भेट

  • Share this:

uddhav neww

18 मे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज काळबादेवी अग्नितांडवात बचाव कार्यादरम्यान शहिद झालेले अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसंच अमिन यांना शहिद दर्जा मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी एकच्या सुमारास अमीन यांच्या चेंबुर इथल्या निवासस्थानी जावून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शिवसेना अमीन कुटुंबियांच्या मागे उभी असून, नुकसान भरपाईबाबत महापालिकेकडून झालेला अन्याय दूर करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी यावेळी दिले.

तसंच अमिन यांना शहीद दर्जा देण्यासह मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घर मिळवून देणे, कुटुंबीयांतील एका सदस्याला नोकरी आणि दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च शिवसेना उचलणार असं वचनही उद्धव ठाकरे यांनी अमीन यांच्या कुटुंबीयांना दिलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2015 07:54 PM IST

ताज्या बातम्या