अरूणा शानबाग यांना अखेरचा निरोप

अरूणा शानबाग यांना अखेरचा निरोप

  • Share this:

Aruna Shanbhagaas

 18 मे : गेल्या 42 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या अरुणा शानबाग यांचं सोमवारी सकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून अरुणा यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार होत होते. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. केईएम रुग्णालयाकडून त्यांच्या निधनाबद्दल माहिती देण्यात आली.

सोमवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. अविनाश सुपे यांनी अरुणा शानबाग यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी केईएम रुग्णालयातील परिचारिका आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरुणा शानबाग अमर रहे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

1973 मध्ये रुग्णालयातील वॉर्डबॉयने केलेल्या लैंगिक अत्याचारानंतर शानबाग कोमामध्ये गेल्या होत्या. गेली 42 वर्षे अरुणा यांच्यावर केईएम रुग्णालयातील 4 ए वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या मेंदूच्या काही भागास होणारा रक्तपुरवठा खंडित झाला. यामुळे त्यांचे काही अवयव आणि संवेदना निकामी झाल्या होत्या. सध्या रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका मिळून अरुणा यांची काळजी घेत होते. या वेदनादायी जीवनातून अरुणाची सुटका व्हावी, यासाठी पिंकी विराणी यांनी सुप्रीम कोर्टात त्यांच्या दयामरणाची याचिका दाखल केली होती. अरुणा शानबाग यांच्या याचिकेनंतरच भारतात इच्छा मरणाची मागणी जोर धरू लागली, पण सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली होती.

गेल्या काही दिवसांपासून अरुण शानबाग यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. तब्बल 42 वर्ष मृत्यूशी झुंज देणार्‍या शानबाग यांनी सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला.

अरुणा शानबाग यांचं आज निधन झालं असलं, तरी त्यांच्यावर हल्ला करणार्‍या सोहनलालचं पुढे काय झालं?

- सोहनलाल वाल्मिकीला नोव्हेंबर 1973मध्ये पुण्यात अटक करण्यात आली

- 1974 साली त्याला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 7 वर्षांची शिक्षा देण्यात आली

- त्याच्याविरोधात बलात्कार किंवा अनैसर्गिक संभोग केल्याचे आरोप लावण्यात आले नव्हते

- अरुणा यांना समाजात त्रास होऊ नये, म्हणून ही कलमं सोहनलालविरोधात लावली नव्हती

- शिक्षा संपल्यानंतर त्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन अरुणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला

- अरुणा यांना सुरक्षित खोलीत हलवल्यानंतर तो दिल्लीत गेला आणि नाव बदलून तिथेच राहू लागला

- त्याला दिल्लीतल्या एक खासगी दवाखान्यात वॉर्डबॉयची नोकरी मिळाली

- तो 2011 साली एड्सने मेला, अशा बातम्या काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2015 09:15 PM IST

ताज्या बातम्या