काबूलमध्ये बॉम्बस्फोट; 3 ठार, 16 जण जखमी

Samruddha Bhambure | Updated On: May 17, 2015 02:57 PM IST

काबूलमध्ये बॉम्बस्फोट; 3 ठार, 16 जण जखमी

17 मे : काबूलमध्ये विमानतळाबाहेर एका कारमध्ये मोठा स्फोट झाला असून, यात 3 ठार झाले. तर 20 जण जखमी झाले आहेत.

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, काबूल विमानतळाबाहेरील एविएशन विभागाजवळील एका कारमध्ये हा स्फोट झाला. यात दोन मुली ठार तर, 20 जण गंभीर जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटात इतर तीन गाडय़ांचे मोठे नुकसान झाले आहे. हा आत्मघातकी हल्ला असल्याची शक्यता ही त्यांनी वर्तवली आहे. आत्तापर्यंत कोणत्याच संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच काबूलच्या एका गेस्ट हाऊसमध्ये हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात 4 भारतीयांसह 14 जण ठार झाले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2015 01:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close