राज्य सहकार बँक घोटाळा प्रकरणी 70 संचालकांना 21 मेची 'डेडलाईन'

  • Share this:

424ajit pawar and bank16 मे : राज्य सहकारी बँकेतल्या 1600 कोटींच्या घोटाळा प्रकरणी बरखास्त संचालक मंडळाला पुन्हा सुधारित नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार 70 माजी संचालकांना येत्या 21 मेच्या आत चौकशी अधिकार्‍याकडे खुलासा करावा लागणार आहे.

सहकार कायदा कलम 88 नुसार सहनिबंधक शिवाजी पैनकर यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान 400 बँक खाती आणि कर्जाची प्रकरणं तपासण्यात आली असून पुढच्या तीन महिन्यात आरोपपत्र सुद्धा दाखल केलं जाणार आहे. माजी मंचालकांना आपलं म्हणणं मांडण्याची 21 मे ही शेवटची संधी आहे. दरम्यान, राज्य सहकारी बँकेच्या निवडणुकीला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिलीय. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं होतं. तेव्हापासून बँकेचा कारभार प्रशासकामार्फतच चालवला जातोय. आणि विशेष म्हणजे बँक सध्या नफ्यात आहे.

Follow @ibnlokmattv

First Published: May 16, 2015 06:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading