'मोनो ड्रालिंग'च्या सुरक्षेवर महिन्याला 75 लाखांचा खर्च !

'मोनो ड्रालिंग'च्या सुरक्षेवर महिन्याला 75 लाखांचा खर्च !

  • Share this:

43443Mumbai_Monorail_run15 मे : मुंबईत मोठ्या दिमखात सुरू झालेली मोनो रेल आता दिवसेंदिवस वादाच्या ट्रॅकवर धक्के खात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेल्या या मोनो ड्रालिंगच्या सुरक्षेसाठी तब्बल 75 लाख 96 हजार 77 रूपये खर्च होत असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उजेडात आलीये. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती समोर आणली असून सुरक्षेचा खर्च तिकिटांच्या दरात भरून काढू नये अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीये.

मुंबई चेंबूर ते वडाळा या मार्गावर धावणार्‍या मोनोरेल मधून दररोज सरासरी 14 हजार 282 प्रवासी प्रवास करतात पण मोनोच्या सुरक्षेवर महिन्याकाठी 76 लाख रूपयांचा खर्च होत असल्याची माहिती उघड झालीये. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या कागदपत्रांनुसार मोनो प्रकल्पावर आत्तापर्यंत 2,290 कोटी रूपये खर्च झाले आहेत. अजूनही संबंधित कंपन्यांना 450 कोटी रूपये द्यायचे बाकी आहेत. असं असताना मोनोची सात स्थानकं आणि डेपोच्या सुरक्षेवर 75 लाख 96 हजार 77 रूपये इतका खर्च महिनाकाठी येतो. त्यामुळे मोनोरेल ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक भाग असावी त्यानुसार सुरक्षाशुल्क प्रवाशांच्या तिकीटावर आकारू नये अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीये. यावर महिन्याकाठी होत असलेल्या सुरक्षा खर्चाचा आढावा घेऊन प्रवाशांचं हित जपलं जाईल असं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिलंय.

Follow @ibnlokmattv

First published: May 15, 2015, 9:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading