जामखेडमध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला, रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 15, 2015 02:18 PM IST

जामखेडमध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला, रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

Jamkheda

15  मे : अहमदनगरमधील जामखेडमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करायला गेलेल्या माहिला पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अतिक्रमण धारकांकडून महिला पोलीस कर्मचार्‍यावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जामखेड इथे बाजारतळावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी गेलेल्या 10 ते 15 पोलीस संतप्त अतिक्रमण धारकांनी हल्ला चढवला. यावेळी त्यांनी तीन महिला कॉन्स्टेबल यांना जबरदस्त मारहाण केली. तसंच, त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून, कारावाई न थांबवल्यास जाळून मारण्याची धमकी दिली आहे. काल संध्याकाळी उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2015 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...