LIVE : दोन्ही देशांमध्ये 100 कोटी डॉलर्सच्या 24 करारांवर स्वाक्षरी

LIVE :  दोन्ही देशांमध्ये 100 कोटी डॉलर्सच्या 24 करारांवर स्वाक्षरी

  • Share this:

BRKING940_201505150757_940x355

15 मे : सीमाप्रश्नाच्या वादाबाबत दोन्ही देशांचे एकमत होईल असा करार तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पेइचिंग इथे चीनचे पंतप्रधान ली केकिआंग आणि नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून या चर्चेनंतर दोन्ही देशांनी 24 करारांवर सह्या केल्या आहेत.

चीन दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी पंतप्रधान नरेंद्र बीजिंगमध्ये आले असून पेइचिंगमध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी ग्रेट हॉल ऑफ पीपल इथे मोदींना चिनी सैन्याकडून गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. यानंतर मोदी आणि ली केकिआंग यांच्यात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. सीमावाद, गुंतवणूक आणि इतर विविध क्षेत्रातील परस्पर सहकार्याबाबतही या वेळी चर्चा झाली. त्याचंबरोबर रेल्वे, शिक्षण, अंतराळ आणि कौशल्य विकास यासह अन्य लहान मोठया अशा तब्बल 24 करारांवर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या.

तीन दिवसांच्या चीन दौर्‍यात मोदींनी काल पाहिल्या दिवशी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या सोबत चर्चा केली होती. त्यानंतर दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी त्यांनी चीनचे पंतप्रधान ली केकिआंग यांच्यासोबत चर्चा केली.

दरम्यान, सीमावादाबाबत दोन्ही देशांना मान्य आणि योग्य असेल असा तोडगा काढू, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त परिषदेत व्यक्त केलं. काही मुद्द्यांबाबत चीनने पुनर्विचार करावा असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी चीनला दिला. व्हिसा पॉलिसी आणि दोन्ही देशांतून वाहणार्‍या नद्यांबाबतच्या धोरणांमध्ये मला मोठ्या बदलाच्या अपेक्षा आहे. आपण एकमेकांबद्दल संवेदनशील असणे महत्वाचे आहे असं पंतप्रधान म्हणाले.

मोदींचा आजचा कार्यक्रम

- स. 8 वाजता - चीनचे पंतप्रधान ली केकिआंग यांच्याशी मोदींची चर्चा झाली

- स. 8.30 वाजता - शिष्टमंडळासोबत बैठक

- स. 9.30 वाजता - शिष्टमंडळासोबतच्या बैठकीनंतर करारावर स्वाक्षर्‍या

- स. 9.50 वाजता - दोन्ही देशांचे पंतप्रधान स्टेट लेव्हल फोरममध्ये भाषण

- दु. 12.30 वाजता - चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या अध्यक्षांची मोदी घेणार भेट

- दु. 1.30 वाजता - शिघुआ विद्यापीठाला मोदी भेट देणार

- दु. 2.45 वाजता - टेंपल ऑफ हेवनला भेट, इथल्या योगा कार्यक्रमात मोदी सहभागी होणार

- संध्या. 6.10 वाजता - शांघायला रवाना होणार

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2015 10:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading