पंतप्रधान मोदींच्या चीन दौर्‍याचा अजेंडा काय ?

  • Share this:

ModiInChina (40)14 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला शेजारी असलेल्या ड्रॅगनच्या देशात अर्थात चीनच्या दौर्‍यावर आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबंध आतापर्यंत 'कभी खुशी कभी गम' असेच राहिले आहे. चीनकडून झालेली घुसखोरी, पाकिस्तानला मदत ही भारतासाठी नेहमी डोकेदुखी ठरलीये. या सगळ्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. त्यामुळे, मोदींच्या दौर्‍याचा अजेंडा काय असणार ते पाहूया....

चीन दौर्‍याचा अजेंडा

- जवळपास 10 हजार कोटींचे करार होण्याची शक्यता

- सीमावाद सोडवण्यावर भर

- आर्थिक संबंध वाढवून मैत्री दृढ करण्याचा मोदींचा मानस

रेल्वे

- नवी दिल्ली-चेन्नई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीत चीनला रस

- 3600 कोटी डॉलर्सचा प्रकल्प

- चेन्नई-बंगऴुरू द्रुतगती रेल्वे प्रकल्पही चीननं राबवण्यावर दोन्ही बाजूंकडून तत्वत: मान्यता

- जपान आणि फ्रान्सलाही बुलेट ट्रेन प्रकल्पांमध्ये रस

 पर्यटन

- चिनी पर्यटकांना ई-व्हिसा मिळण्याची शक्यता

- पण ई-व्हिसाला गुप्तचार यंत्रणांचा विरोध

- नजीकच्या काळात चिनी पर्यटकांना 'व्हिसा ऑन अरायव्हल'ही मिळू शकतो

- चीनमध्ये जाणार्‍या भारतीय नागरी विमानांची संख्या मोदी वाढवू शकतात

- बीजिंग आणि शांघायला उड्डाणं वाढू शकतात

- सध्या जेवढे चिनी पर्यटक परदेश दौरा करतात, त्यातले फक्त 0.18 टक्के भारतात येतात

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2015 07:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading