सेनेनं पंतप्रधानांचं आवाहन धुडकावलं, जैतापूरला विरोध कायम

  • Share this:

uddhav on modi_land_bill14 मे : जैतापूर प्रकल्पासंदर्भात शिवसेनेची आक्रमक भूमिका कायम आहे. आज गुरुवारी 'मातोश्री'वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना खासदारांची याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेने प्रकल्पाबाबत आपली भूमिका कायम ठेवत विरोध कायम ठेवण्याचा निर्धार केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतरही सेनेचा विरोध कायम आहे आणि सेनेने पंतप्रधानांचं आवहन धुडकावलंय.

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेनं सुरूवातीपासून विरोध केलाय.वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर आता शिवसेनेनं पुन्हा एकदा जैतापूरचा विषय पुढे करत आपला विरोध प्रखरपणे दर्शवलाय. काल बुधवारीच शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन जैतापूरला विरोध दर्शवला होता. पण, पंतप्रधानांनी विकासाला विरोध करू नका असा सल्ला दिला होता. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सेना खासदारांची बैठक घेतली. पंतप्रधानांचं आवाहन सेनेनं साफ धुडकावून लावत विरोध कायम राहणार असं स्पष्ट केलंय. सेनेने या मुद्यावर आक्रमक राहायचं ठरवल्याने पुन्हा एकदा सेना-भाजप आमनेसामने आले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2015 05:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading