LIVE :पंतप्रधान मोदी आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

LIVE :पंतप्रधान मोदी आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

  • Share this:

14 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 देशांच्या दौर्‍याला आजपासून सुरुवात झाली आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे चारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचं शियान विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं.

 

Narendra modi in china

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं शहर असलेल्या शिआन प्रांतात मोदी आहेत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदींची आज भेट झाली आणि त्यांनी शिआनमधल्या प्रसिद्ध बिग वाईल्ड गूज पॅगोडाला भेट दिली. याशिवाय या दोघांमध्ये उच्चस्तरीय बैठकही पार पडली. तब्बल 90 मिनिटं चाललेल्या या बैठकीत   सीमावाद, दोन्ही देशांमधला व्यापार, दहशतवादासारख्या मुद्यांवर यात चर्चा झाल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी सांगितलंय. शी जिनपिंग यांनी प्रोटोकॉल मोडत पंतप्रधान मोदींचं स्वागत केलंय. त्यापूर्वी आज सकाळी पंतप्रधान मोदींनी ऐतिहासिक टेराकोटा म्युझियम आणि द शिंग बुद्धिस्ट टेंपललाही भेट दिली.

 बिग गूज पॅगोडाबद्दल

- बिग गूज पॅगोडा भेट याला दायान पॅगोडा म्हणतात

- बिग वाईल्ड गूज पॅगोडा शिआन प्रांतात आहे

- तांग राजघराण्याच्या काळात या पॅगोडाची निर्मिती

- बौद्ध धर्मियांसाठी महत्त्वाचं स्थान

- सात मजली आणि 210 फूट उंच पॅगोडा

- बौद्ध धर्मियांची तत्त्वे भारतातून चीनमध्ये याच ठिकाणी सर्वप्रथम आणली गेली

- इथंच याचं भाषांतर चायनीज भाषेत करण्यात आलं

- इथंच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत

स्वागतासाठी नृत्याच्या कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीन दौरा सुरू झाला. त्यांच्या स्वागतासाठी शियान विमानतळावर नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर ऐतिहासिक टेराकोटा वॉरियर्स संग्रहालय आणि प्राचीन दा शिंग शांग मंदिरालाही भेट दिली. शांती आणि सद्भावनेसाठी त्यांनी प्रार्थना केली.

टेराकोटा वॉरियर्स संग्रहालयाला भेट

शियान प्रांतातील टेराकोटा वॉरियर्स संग्रहालयाला भेट दिली. इ.स.पूर्व तिसर्‍या शतकातील सैनिकांचे पुतळे तिथे आहेत. कीन शु हुआंग या राजाने या टेराकोटा वॉरियर्सची निर्मिती केली होती. 1974 साली एका चिनी शेतकर्‍याला विहिर खोदताना हे पुतळे दिसले. जवळपास 8000 सैनिक , 150 अधिकारी आणि 520 घोड्यांचे पुतळे या संग्रहालयात आहेत. टेराकोटा वॉरियर्स जगातलं एक आश्चर्य मानलं जातं. शियान ही चीनची प्राचीन काळातली राजधानी होती. या दौर्‍यादरम्यान, व्यापार आणि पर्यटनासह अनेक विषयांवर चीनसोबत चर्चा होणार आहे. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन सीमाभागावर कोणतीही चर्चा होणार नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2015 02:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading