'स्वाभिमानी'ला अखेर लालदिवा पण, सदाभाऊंची मात्र संधी हुकली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 13, 2015 09:16 PM IST

'स्वाभिमानी'ला अखेर लालदिवा पण, सदाभाऊंची मात्र संधी हुकली

13 मे : महायुतीच्या बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लाल दिवा मिळालाय. स्वाभिमानी संघटनेचे विदर्भातले नेते आणि युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना यंत्रमाग विकास महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलंय. पण, सदाभाऊ खोत यांची लालदिव्याची संधी हुकलीये.sadabhau khot news

विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, भाजप सत्तेवर येऊन सुद्धा स्वाभिमानीच्या पारड्यात कोणतही मंत्रिपद पडलं नाही. वेळोवेळी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर अखेरीस 'स्वाभिमानी' ला लालदिवा मिळालाय. आजच यासंबंधीचा निर्णय जाहीर झालाय. युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना यंत्रमाग विकास महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलंय.पण संघटेनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांचं काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहतोय. त्यांची लालदिव्याची संधी पुन्हा हुकलीय. म्हणूनच त्यांची लालदिव्याची संधी नेमकी कोणी हुकवली याचीही खमंग चर्चा यानिमित्ताने सुरू झालीय. सूत्रांच्या माहितीनुसार आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संघटनेला एखादं राज्यमंत्रिपद दिलं जाईल असं आश्वासनं दिल्याचं कळतंय. पण हे मंत्रिपद खरंच मिळणार का ?, याबाबत कोणीच खात्री देऊ शकत नाही. म्हणूनच भाजपने तुपेकरांना लालदिवा देऊन स्वाभिमानी संघटनेतच वाद वाढवला नाहीना अशी चर्चा सुरू झालीय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2015 09:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...