भारत-पाक क्रिकेट'युद्धा'ला केंद्राचा ग्रीन तर सेनेचा रेड सिग्नल !

भारत-पाक क्रिकेट'युद्धा'ला केंद्राचा ग्रीन तर सेनेचा रेड सिग्नल !

  • Share this:

india pak criket13 मे : भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा क्रिकेट युद्ध पेटणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सिरीज दुबईत रंगणार आहे आणि या सिरीजला मोदी सरकारने हिरवा कंदील दिलाय. डिसेंबरमध्ये भारत-पाक दरम्यान 5 वन डे मॅचेस, 3 कसोटी आणि 2 ट्वेन्टी मॅचेस होणार आहे. मात्र, या सिरीजला शिवसेनेनं विरोध दर्शवला असून सामने होऊ देणार नाही असा इशारा दिलाय.

भारत आणि पाकिस्तानमधली सीरीज ही दुसर्‍या कुठल्या सीरीजएवढी साधी नाही. भारत आणि पाकिस्तानमधल्या मॅचला क्रिकेट फॅन्सची तूफान गर्दी होते. पण भारत आणि पाकिस्तामधले तणावाचे संबंध पाहता या सीरीजमध्ये बर्‍याच अडचणी येत असतात. यावेळी मात्र पाकिस्तानने भारताच्या टीमला या सीरिजसाठी आमंत्रण दिलंय. आणि भारत सरकारनेही त्याला हिरवा कंदील दिलाय.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी घेतली अरूण जेटलींची भेट घेतली. शहरयार खान हे गेल्या आठवड्यात भारतामध्ये तळ ठोकून होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये डिसेंबर महिन्यात सीरिज आयोजित करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रयत्न करतंय. त्याला आता मोदी सरकारने हिरवा कंदील दिलाय. पण, शिवसेनेनं मात्र आपल्या भूमिकेवर कायम राहत या सीरिजला विरोध केला आहे.आमचा विरोध आधीपासूनच तो उद्याही राहील. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोवर भारत-पाक मॅचेसना आमचा विरोध राहिल असं सेनेचे नेते अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

First published: May 13, 2015, 7:16 PM IST

ताज्या बातम्या