कराचीत दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, 47 ठार

कराचीत दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, 47 ठार

  • Share this:

karachi

13 मे : पाकिस्तानमधल्या कराचीत एका बसवर आज दहशतवाद्यांनी हल्ला केला. तीन बाईकवरून आलेल्या सहा दहशतवाद्यांनी एका बसवर अंदाधुंद गोळीबार करत 47 प्रवाशांना ठार केलं. मृतांमध्ये 16 महिलांचा समावेश आहे. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय.

कराचीमधल्या सफुरा चौकात बाईकवरून आलेल्या 6 दहशतवाद्यांनी अल अझहर कंपनीची बस थांबवली आणि बसमध्ये चढून अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी बसमध्ये 60 प्रवासी होते. या हल्ल्यात 47 प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. हल्ल्यातल्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास कार्य सुरू करण्यात आलं आहे.

या बसमधून इस्मायली पंथाचे नागरिक प्रवास करत होते. याच पंथाला लक्ष्य करणं हा या दहशतवाद्यांचा हेतू होता, अशी प्राथमिक माहिती आहे. इस्मायली हा शिया पंथातलाच उप-पंथ आहे. पाकिस्तानात शिया हे अल्पसंख्याक आहेत, तर सुन्नी मुसलमान हे बहुसंख्याक आहेत. शिया पंथ हा गेली अनेक वर्षे दहशतवाद्यांच्या रडारवर आहे.

Follow @ibnlokmattv

First published: May 13, 2015, 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading