भूकंपाचे धक्के आणखी 5 ते 6 महिने बसणार ?

भूकंपाचे धक्के आणखी 5 ते 6 महिने बसणार ?

  • Share this:

12 मे : नेपाळमध्ये आज पुन्हा भूकंपाचा मोठा हादरा बसल्यामुळे अवघ्या जगाचा काळजाचा ठोका चुकला. दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या विनाशकारी भूकंपाने नेपाळकडून होतं नव्हतं हिरावून नेलं. त्यात आज पहिल्या भूकंपापेक्षा थोडासा कमी तीव्रतेचा 7.4 इतका भूकंप आला. या भूकंपात नेपाळमध्ये 36 आणि भारतात 10 लोकांचा मृत्यू झाला. पण, भूकंपाचा हा पिच्छा आणखी पाच ते सहा महिने सुटणार नाहीये अशी माहिती भूगर्भशास्त्र डॉ. धनंजय येडेकर यांनी दिली. भूगर्भात युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेट स्थिर होण्यासाठी पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागत असतो. त्यामुळे येत्या काही काळात भूकंपाचे धक्के बसणार आहे असा अंदाज येडेकर यांनी व्यक्त केलाय.

भूकंप होतो म्हणजे नेमकं काय होतं ?

डॉ. धनंजय येडेकर सांगतात, भूगर्भात इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट आहे. इंडियन प्लेट ही युरेशियन प्लेटच्या खाली सरकत चाललीये. इंडियन प्लेट खाली सरकत असते. तेव्हा दोन्ही प्लेटचं घर्षण होतं. जेव्हा इंडियन प्लेटचं खाली सरकण्याची सीमा संपुष्टात येते. तेव्हा दोन्ही प्लेट लॉक होतात. लॉक झाल्यामुळे युरेशियन प्लेटला खाली सरकण्यासाठी जागा शिल्लक नसते. तेव्हा युरेशियन प्लेटचा भार खाली न जाता तो अचानक वरती सरकतो तेव्हा भूकंप होतो.

indian plate and eurasian plate'भूकंपाचे हादरे आणखी बसणार'

पण, आता ही युरेशियन प्लेट पूर्णपणे मागे आलेली नाही. नेपाळमध्ये मागे आलेल्या 7.9 तीव्रतेच्या भूकंपामुळे अजूनही या दोन्ही प्लेट पूर्णपणे स्थिर झालेल्या नाही. या दोन्ही प्लेटमधली ऊर्जा संपलेली नाही. त्यामुळे असे भूकंप होत राहिल. यापुढील आणखी पाच ते सहा महिने भूकंपाचे धक्के जाणवत राहतील. आता 7.4 चा धक्का आला. आता तो कमी कमी म्हणजे 5.6, 5.1, 4.1 अशा क्रमाने कमी-कमी होत जाईल. पण लगेच ही प्रक्रिया थांबणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागतो. याकाळात भूकंपाचे धक्के जाणवणार. आज आलेला 7.4 चा धक्का हा मोठा आहे. 7.9 चा अगोदर आलेला धक्का त्याहीपेक्षा मोठा होता. जर याची तीव्रता 8.2 अशी झाली तर ती पृथ्वीच्या गुरत्वाकर्षणाच्या विरू द्ध दिशेनं असते. 5 ते 6 रिश्टर स्केल तीव्रता सौम्य असते पण जर 8 रिश्टर स्केलचा आकडा ओलाडला तो पृथ्वीसाठी धोकादायक ठरेल असंही येडेकर यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

First published: May 12, 2015, 10:37 PM IST

ताज्या बातम्या