S M L

मुंबई हायकोर्टाचं ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात

Samruddha Bhambure | Updated On: May 12, 2015 03:52 PM IST

मुंबई हायकोर्टाचं ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात

12 मे : पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आज (मंगळवारी) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई हायकोर्टाचा ‘सर्किट बेंच' कोल्हापुरात सुरू करण्याचा निर्णय राज्य कॅबिनेटने घेतला आहे. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला कोर्टाच्या कामकाजासाठी मुंबईतल्या हायकोर्टात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

गेल्या 28 वर्षांपासून कोल्हापुरात मुंबई हायकोर्टचं खंडपीठ व्हावं अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि वकिलांनी लावून धरली होती. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनही केली. त्यापार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत, खंडपीठाच्या निर्मितीचे संकेत देत सर्क्यूलर बेंचला मान्यता देण्यात आली. या ‘सर्किट बेंच'चे कामकाज महिन्याचे काही दिवस कोल्हापुरात चालणार आहे.सरकारच्या या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.या भागातील सुमारे 3 कोटी लोकांच्या 53 हजार खटले मुंबईहून कोल्हापूरच्या बेंचमध्ये हलवल्या जातील. पण यासाठी अजून काही काळवाट पाहावी लागणार आहे. करण आताशी फक्त मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यापुढे मुंबई हायकोर्टाने आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावर शिक्कामोर्तब करणं गरजेचं आहे.

सर्किट बेंच म्हणजे काय?

- दर महिन्यातून काही विशिष्ट दिवस कोर्ट चालणार

Loading...

- तेवढ्या दिवसांपुरतेच न्यायमूर्ती कोल्हापूरला जाणार

- 1984 साली औरंगाबादलाही सर्किट बेंच स्थापन केले होते

- केसेसची संख्या वाढल्यावर सर्किट बेंचचं पूर्णवेळ खंडपीठात रूपांतर केले

- आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची मंजुरी आवश्यक

- मुंबई हायकोर्टाचे सध्या नागपूर, औरंगाबाद, गोवा इथं आधीपासून पूर्णवेळ खंडपीठं

- कलकत्ता हायकोर्टाचं पोर्ट ब्लेअर इथं सर्किट बेंच

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2015 01:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close