‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधी प्रियंका डहाळेचं नाशिकजवळ अपघाती निधन

‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधी  प्रियंका डहाळेचं नाशिकजवळ अपघाती निधन

  • Share this:

nashik accident

12 मे :'दिव्य मराठी' या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधी प्रियंका डहाळेचा नाशिकच्या पाथर्डीजवळ काल (सोमवारी) रात्री अपघाती मृत्यू झाला आहे. मुंबईहून कूल कॅबनं नाशिकला जात असताना वाळूच्या ट्रकची आणि कूल कॅबची धडक झाली. अपघातानंतर प्रियंकाला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

नियतीचा क्रूर खेळ असा की दोनच दिवसांनी म्हणजे 14 मे रोजी तिचा साखरपुडा होता. त्यासाठी प्रियांका एका टॅक्सीमधून नाशिकला जात होती आणि गाडीच्या पुढे एक वाळूचा ट्रक होता. या ट्रकची मागची झडप अचानक उघडली आणि वाळू टॅक्सीच्या काचेवर पडली. यामुळे टॅक्सी चालकाला पुढचं दिसेनासं झालं आणि ही टॅक्सी ट्रकमध्ये घुसली. या अपघातात एकूण 3 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. हा अपघात इतका मोठा होता, की टॅक्सीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. दिव्य मराठी वृत्तपत्रात सिने आणि सांस्कृतिक पत्रकार म्हणून प्रियंका कार्यरत होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2015 09:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading