मंत्र्यांनी केले हातवर, 'तो बार नव्हे तर फॅमिली रेस्टॉरंट' !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 11, 2015 11:26 PM IST

मंत्र्यांनी केले हातवर, 'तो बार नव्हे तर फॅमिली रेस्टॉरंट' !

kesarkar on kirti bar11 मे : गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बारचं उद्घाटन करून वादाचा 'बार' उडवून दिलाय. पण आपण बारचं उद्घाटन केलंच नाही यावर दोन्ही मंत्री ठाम आहे. आम्ही ज्या बारचं उद्घाटन केलं नाही ते एक फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन करण्यात काहीच गैर नाही असा अजब खुलासा दीपक केसरकर यांनी केलाय. तर राम शिंदे यांनीही केसरकर यांच्या विधानाची रेघ ओढलीये.

चंद्रपुरात दारूबंदी करून राज्य सरकार आपली पाठ थोपटून घेतंय. तर दुसरीकडे याच सरकारमधले मंत्री बारच्या उद्घाटनाला जात आहेत. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी रात्री एका बारचं उद्घाटन केलं. नगर-पुणे रोडवर कीर्ती बार आणि रेस्टॉरंट आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते आणि इतर अनेक राजकीय नेतेही होते. हे एक फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि त्याचं उद्घाटन करण्यात काहीही गैर नसल्याचं स्पष्टीकरण राम शिंदे यांनी दिलं आहे. तसंच कीर्ती रेस्टॉरंट ज्यांनी सुरू केलंय त्यांनी संपूर्ण परवानग्या घेतल्या होत्या. परमीट रूम काही बेकायदेशीर नाहीये. जर परवानग्या काढल्या असतील तर त्यात गैर काही नाहीये. राज्यात जिथे दारूबंदी हवीये तिथे दारूबंदी करण्यात आलीय असंही शिंदे म्हणाले.

तर दीपक केसरकर म्हणतात, मुळात बारचं उद्घाटन म्हणणं साफ चुकीचं आहे. त्या ठिकाणी कीर्ती फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. कीर्ती रेस्टॉरंट ज्या इमारतीत आहे त्या इमारतीत व्हेज रेस्टॉरंट आहे आणि जो बार आहे तो 2013 साली सुरू झालाय. आता 2013 सालच्या बारचं उद्घाटन कसं होणार ?, मुळात प्रत्येक गावात अंतर्गत वाद असतात. त्यातूनचही बातमी पसरवण्यात आलीये. आम्हाला जी पत्रिका देण्यात आली होती. त्यात फॅमिली रेस्टॉरंट असा उल्लेख होता. ज्यांनी हे रेस्टॉरंट सुरू केलंय ते सर्व डॉक्टर मंडळी आहे. ती आमच्या परिचयाची आहे. त्यामुळेच आम्ही उद्घाटनला गेलो.

खरंतर दारूबंदी आणि पर्यटन वेगळे विषय आहे. ज्या ठिकाणी दारूबंदी हवीये त्या ठिकाणी केलीये. पण, पर्यटनासाठी सुविधाही देण गरजेच आहे. पर्यटनासाठी सुविधा देण हे ठामपणे सांगण्याची वेळ आलीये. त्या कॉम्लेक्समध्येही सुविधा देण्यात आल्या असतील. पण, त्याचा संबंध बार उद्घाटनासाठी नाहीये असंही केसरकर म्हणाले.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2015 07:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...