S M L

'हुंडाखोर' नवरदेव, वाढीव हुंड्यासाठी लग्नमंडपात आलाच नाही !

Sachin Salve | Updated On: May 11, 2015 06:28 PM IST

'हुंडाखोर' नवरदेव, वाढीव हुंड्यासाठी लग्नमंडपात आलाच नाही !

11 मे : एकीकडे हुंडा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे. पण आजही अनेक ठिकाणी सर्रास हुंडा घेतला जातो आणि इतकंच नाही तर हुंड्यासाठी सर्रासपणे वधू आणि वधू पित्याला छळलं जातंय. अशीच घटना बुलडाण्यात घडलीये. ऐन लग्नाच्या दिवशी वाढीव हुंड्यासाठी अडून बसलेला नवरदेव लग्न मंडपात आलाच नाही. या नवरदेवाने अगोदरच 61 हजार रुपये घेतले पण वाढीव 40 हजारांसाठी लग्नाच्या बोहल्यावर न चढण्याचा संतापजनक निर्णय घेतलाय. या प्रकरणी नवरदेवाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील नारखेड गावातील प्रकाश गणाजी चव्हाण यांच्या मुलीचं लग्न अकोटच्या पाळसो-बढे गावातील सुरेश गजानन राठोड याच्या सोबत ठरलं होतं. त्यावेळी प्रकाश चव्हाण यांनी 61 हजार रु . हुंडा देण्याचं ठरवून कुंकवाचा कार्यक्रमही पार पाडला. त्यानुसार वराला 61 हजार रुपये हुंडा देण्यात आला. 5 मे लग्नाची तारीख ठरली. पत्रिकाही वाटण्यात आल्या. लग्नाच्या दिवशी वर सुरेश गजानन राठोडसह 7 जणांनी, मुलीच्या वडलांकडे आणखी 40 हजार रुपयांची मागणी केली. वाढीव हुंडा दिला नाहीतर  लग्न न करण्याची धमकीही दिली.. परंतु वधू पित्याकडे फक्त 3 एकर शेती आहे. त्यावर तो आपले घर चालवितो कसेतरी त्यांनी वराला 61000रु. आपले होते नव्हते पणाला लाऊन कर्ज काढून वराला दिले. परंतु,आता त्यांच्याकडे वराच्या या वाढीव मागणीला पूर्ण करण्या करिता 1 ही पैसा शिल्लक नव्हता. त्याने मुलीच्या लग्नाच्या तयारीत वाजंत्रीवाल्याला, आचार्याला, मंडपवाल्याला सर्वांना पैसे देवून तो मोकळा झाला होता. सर्व पाहुणे मंडळी घरी गोळा झाली होती, परंतु 5 मेला ऐन वेळेवर हुंड्याची मागणी पूर्ण करू न शकल्यानं नवरदेव आलाचं नाही. आलेले पाहुणे लग्न न लावताचं परत गेले. याबाबत वधू पित्यानं पोलिसांत तक्रारही दाखल केली.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2015 06:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close