पूर्ती गैरव्यवहार प्रकरणावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ

Samruddha Bhambure | Updated On: May 11, 2015 03:01 PM IST

पूर्ती गैरव्यवहार प्रकरणावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ

11  मे : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समुहातील गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून राज्यसभेचं वातावरण आज चांगलंच तापलंं.पूर्ती गैरव्यवहार प्रकरणावर  गडकरी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दोनवेळा तहकूब करावं लागलं.

पूर्ती उद्योग समुहातील आर्थिक गैरव्यवहारावरून कॅगने जाहिर केलेल्या अहवालात गडकरींवर ताशेरे ओढले आहेत. या पार्श्वभूमीवर कॅगच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने राज्यसभेत नोटीस बजावली. तसंच, गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणीही काँग्रेसने केली होती. त्यावर स्पष्टकरण देताना गडकरी यांनी पूर्ती उद्योग समुहातल्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. पूर्ती साखर कारखान्याला कोणतेही अनुदान मिळालेले नाही. त्याचबरोबर कॅगच्या अहवालात आपल्यावर गैरव्यवहारासंदर्भात कोणतेही आरोप केले नसल्याचे गडकरी यांनी सभागृहात स्पष्ट केलं आहे. गडकरींच्या स्पष्टकरणावर समाधान न झालेल्या विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. त्यामुळे सभापतींनी राज्यसभेचं कामकाज दोनवेळा तहकूब करावं लागलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2015 12:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close