शेतीसाठी खत म्हणून मल्टिप्लेक्समधील मानवी मलमूत्र वापर, खडसेंची कल्पना

  • Share this:

khadase_sot09 मे : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यापाठोपाठ आता महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आगळीवेगळी कल्पना मांडलीये. शेतीसाठी आता मानवी मलमूत्र वापरण्याचा सरकारचा विचार आहे असं कृषीमंत्री एकनाथ खडसे म्हणाले आहे. यासाठी मल्टिप्लेक्स आणि मॉल्समधल्या शौचालयांचा वापर केला जाऊ शकतो अशी कल्पना खडसेंनी सुचवलीये.

रासायनिक खतामुळे शेतीची हानी होत आहे. त्यामुळे यापूर्वी गुरांच्या मलमूत्रांपासून सेंद्रीय खतांच्या प्रयोगाला सुरुवात झालीये असं सांगत खडसेंनी भन्नाट कल्पना सुचवलीये. मानवी मलमूत्र खत म्हणून हे शेतीसाठी फायद्याचे आहे असं सांगत एकनाथ खडसे यांनी नितिन गडकरी यांनी शेतकर्‍यांना मानव मलमुत्राचा वापर शेतीत करण्याचा जो सल्ला दिला होता त्याचे समर्थन केलंय.

या संबंधी सरकार विशेष प्रयत्न करणार असल्याचंही खडसे म्हणाले. शासनाने जरी हा निर्णय घेतला असला तरी मानवी मूत्र हे सार्वजनिक मूत्रालय मॉल आदी ़ठिकाणाहुन गोळा करणे शक्य असले तरी त्याचा लाभ छोट्या शेतीलच होईल परंतु महाराष्ट्रात अशा स्वरूपचे प्रयोग यशस्वी होतील का या बाबत साशंकता आहे असंही खडसे म्हणाले.

Follow @ibnlokmattv

First published: May 9, 2015, 9:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading