नवी मुंबईत अपक्ष उमेदवाराच्या गळ्यात महापौरपदाची माळ

नवी मुंबईत अपक्ष उमेदवाराच्या गळ्यात महापौरपदाची माळ

  • Share this:

Navi Mumbai09 मे : नवी मुंबईत महापौरपदाची माळ अखेर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गळ्यात पडलीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुधाकर सोनावणे विजयी झाले आहे. सोनावणेंना 67 मतं मिळाली. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे संजू वाडे यांना 44 मतं मिळाली.

नवी मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनावणे यांना महापौराची उमेदवारी दिली. तर आपला मित्र पक्ष काँग्रेसला उपमहापौरपद दिलंय. तर दुसरीकडे युतीनंही महापौर, उपमहापौर पदाचे उमेदवार रिंगणात उतरवले होते. महापालिका निवडणुकीत 111 पैकी 52 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर काँग्रेसबरोबर आघाडी केल्यानं 10 नगरसेवकांची भर पडलीय. निवडणुकीचे निकाल लागताच 5 अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागल्यानं आघाडीची संख्या 67 झालीय. त्यामुळे राष्ट्रवादीचा महापौर होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, शिवसेनेनं महापौरपदाच्या निवडीत उडी घेतल्यामुळे चुरस निर्माण झाली होती. पण राष्ट्रवादीकडे असलेल्या संख्याबळापुढे शिवसेनेला माघार घ्यावी लागलीये.

 

Follow @ibnlokmattv

First published: May 9, 2015, 1:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading