07 मे : शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांची सरशी झाली. थोरात गटाला 11, तर राधाकृष्ण विखे पाटील गटाला 10 जागा मिळाल्या.
बँकेतील राजकारणात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे पारंपारिक विरोधक आहेत. यापूर्वी जिल्हा बँकेवर नेहमी थोरात गटाचंच वर्चस्व राहिलं आहे. पण नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा मोठी उलथापालथ झाली. बाळासाहेब थोरात यांच्या गटाला शह देण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेवटच्या क्षणी शिवसेभाजप आणि शिवसेनेबरोबर आघाडी केली होती. त्यामुळे या निवडणुकीत थोरात आणि विखे पाटील यांच्या गटात काटेकी टक्कर पाहायला मिळाली.
मतमोजणीत सुरूवातीला विखे पाटील गटाने आघाडी घेतली होती. पण, त्यानंतर अगदी शेवटच्या दोन जागांवर थोरात गटाने कमबॅक करून 21 पैकी 11 जागा जिंकत आपलं वचर्स्व कायम राखलं. तर थोरात गटाला 10 जागा मिळाल्या.
Follow @ibnlokmattv |