धनंजय मुंडेंना तिसर्‍यांदा धोबीपछाड, बीड जिल्हा बँकेवर पंकजा मुंडेंची सत्ता

धनंजय मुंडेंना तिसर्‍यांदा धोबीपछाड, बीड जिल्हा बँकेवर पंकजा मुंडेंची सत्ता

  • Share this:

pankaja munde

07 मे : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे सभापती धनंजय मुंडे यांना धोबीपछाड देत भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. पंकजा यांच्या पॅनेलने सर्वाधिक जागा जिंकत धनंजय यांना मात दिली आहे.

वैद्यनाथ सहकारी कारखाना निवडणुकीतील पराभवानंतर धनंजय मुंडे यांना बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात पुन्हा वर्चस्वाची लढाई झाली. बँकेच्या 19 पैकी 7 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित 14 जागांसाठी निवडणूक झाली. आज सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर धनंजय मुंडे गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. तर 16 जागा जिकंत पंकजा मुंडे गटाने बीड बँकवर वर्चस्व कायम राखले. दरम्यान, या निवडणुकीत बंडखोरीचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2015 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading