जिल्हा बँकेची आज मतमोजणी

जिल्हा बँकेची आज मतमोजणी

  • Share this:

jilha-madhyavarti bank election

07 मे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झालीय. अनेक ठिकाणचे कलही येऊ लागलेत. निकालांबाबत सगळीकडे कमालीची उत्सुकता आहे. राज्यातल्या अनेक जिल्हा बँकाचा निकाल आज येणार आहे. यात प्रामुख्याने मुंबई, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, परभणी, सिंधुदूर्ग, रत्नागिरी यांचा समावेश आहे.

राज्यभरातून या निवडणूकांसाठी अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कोकणात नारायण राणे, मराठवाड्यात धनंजय मुंडे, चंद्रकांत खैरे, पश्चिम महाराष्ट्रात पतंगराव कदम, हसन मुश्रीफ तर जळगावात एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकांमध्ये पणाला लागली आहे. सर्वात महत्त्वाची निवडणूक लढली जातेय ती अहमदनगरमध्ये. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोन गटात हा सामना चांगलाच रंगला आहे.

जिल्हा बँकेची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली असते त्यामुळे या बँकेच्या माध्यमातून स्थानिक राजकारणावर चांगली पकड ठेवता येते. त्यामुळे आता जिल्हा बँकांवर कोणाची सत्ता येते, त्याकडे लक्ष लागलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत राणेंची सरशी

- राणेंच्या संकल्पसिद्धी पॅनलनं 18 पैकी 12 जागा जिंकल्या

- शिवसेना, भाजप आघाडीच्या पॅनलला 2 जागा

रत्नागिरीत सहकार पॅनलची सत्ता

- भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पॅनलला 16 जागा

- रत्नागिरीत शिवसेनेचीही मुसंडी

- शिवसेनेच्या शिवसंकल्प पॅनलला 5 जागा

नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत अशोक चव्हाणांना दणका

- सेना भाजपा राष्ट्रवादी युती प्रणीत शेतकरी विकास पैनलला 16 जागा

- खासदार अशोक चव्हाण यांच्या किसान समृधी पैनलला 5 जाग

- नांदेडमध्येच अशोक चव्हाणांचा पराभव

मुंबई बँकेवर पुन्हा सहकार पॅनलची सत्ता

- प्रवीण दरेकर यांनी राखली सत्ता

- दरेकरांच्या सहकार पॅनलला 12 जागा

- तर शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनलला फक्त 4 जागा

- 21 पैकी आतापर्यंत 14 जागांचे निकाल हाती

धुळे-नंदुरबार जिल्हा बँक

- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

- 17 पैकी 16 जागा

- भाजपचा सुपडा साफ

कोल्हापूर जिल्हा बँक

- एकूण जागा 17

- काँग्रेस-राष्ट्रवादी 3

- सेना-भाजप 1

- अपक्ष 4

Follow @ibnlokmattv

First published: May 7, 2015, 10:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading