S M L

अभिजीत यांचा बिघडला सूर, ‘कुत्ता रोड पर सोएगा तो मरेंगा’

Sachin Salve | Updated On: May 6, 2015 04:34 PM IST

अभिजीत यांचा बिघडला सूर, ‘कुत्ता रोड पर सोएगा तो मरेंगा’

06 मे : फुटपाथ अपघात प्रकरणी अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे बॉलिवूडकरांवर दुखाचा डोंगर कोसळलंय. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. पण सुप्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य यांनी वादग्रस्त ट्विट करून कहर केलाय.

'कुत्ता रोड पर सोयेगा तो कुत्ते की मौत मरेगा' अशा शब्दात अभिजीत यांनी ट्विट केलंय. अभिजीत एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे ते म्हणतात रोड काही गरिबांच्या बापाचे नाही. मी ही एक वर्ष बेघर होतो, पण रस्त्यावर कधी झोपलो नाही असंही अभिजीत म्हणाले.

अभिजीत यांच्या वाचाळगिरीपणामुळे ट्विटरवर तीव्र संताप उमटत आहे. विशेष म्हणजे अभिजीत यांनी आपल्या ट्विटमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हालाही ऍट केलंय. अभिजीत यांच्या ट्विटचा ट्विटरकरांनी खरपूस समाचार घेतलाय.

अभिजीत भट्टाचार्य ट्विटरवर काय म्हणालेत ?

Loading...
Loading...

"कुत्ता रोड पर सोयेगा तो कुत्ते की मौत मरेगा. रोड्स गरीब के बाप के नहीं हैं. मी एक वर्षं बेघर होतो, पण रस्त्यावर कधी झोपलो नाही."

 

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2015 04:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close