'टाइमपास २' सुसाट; तीन दिवसांत कमवला 11 कोटींचा गल्ला!

'टाइमपास २' सुसाट; तीन दिवसांत कमवला 11 कोटींचा गल्ला!

  • Share this:

1st-day-box-office-collection-of-timepass-2

04 मे : दिग्दर्शक रवी जाधवने बहुदा साईबाबांची शप्पथ घेतलेली दिसतेयं. कारण, 'टाइमपास'चा सिक्वल असलेल्या 'टाइमपास 2' या चित्रपटाने चार दिवसांत 11 कोटींचा गल्ला जमावला आहे. त्यामुळे रवी जाधवचा टाइमपास 2 हा रितेशच्या लय भारी या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता वर्तविणे चुकीचे ठरणार नाही.

प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांची प्रमुख भूमिका असलेला 'टाइमपास 2' हा चित्रपट 1 मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी रिलीज झाला. सलग चार दिवस लागून आलेल्या सुट्‌ट्यांचा फायदा या चित्रपटाच्या कमाईवर झाल्याचा दिसून येत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी 3.75 कोटी, शनिवारी 3 कोटी आणि रविवारी तब्बल 4 कोटी रूपयेंची कमाई करून दिली आहे. केवळ 3 दिवसांच्या या कमावईवरून पुढील काही दिवसांत हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करेल, यात काही शंकाच नाही.

Follow @ibnlokmattv

First published: May 4, 2015, 4:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading