टीपी-2चा इतिहास, पहिल्याच दिवशी 3 कोटी 80 लाखांची रेकॉर्डब्रेक कमाई

  • Share this:

vlcsnap-2015-03-14-14h55m22s6302 मे : दगडू आणि प्राजूची लव्हस्टोरी पुन्हा एकदा सुपरडूपर हीट ठरलीये. टाइमपास 2 ने बॉक्सऑफिसवर सर्वात मोठी कमाई पहिल्याच दिवशी करून मराठी सिनेविश्वात नवा विक्रम केलाय. पहिल्या दिवशी टाइमपास 2 ने तीन कोटी ऐंशी लाख एवढी घसघशीत कमाई केलेली आहे. याआधी लय भारीने 3 कोटी कमावले होते. तो विक्रम मोडून टाइमपास 2 ने नवा इतिहास घडवलेला आहे. महाराष्ट्रात 450 स्क्रिन्सवर टाईमपास 2 चा आनंद प्रेक्षक घेत आहेत.

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून टाइमपास-2 राज्यभरात रिलीज झालाय. टाईमपास - 2 बहुसंख्य ठिकाणी हाऊसफुल्ल असल्याचं चित्र दिसतंय. विकेंड, त्यात जोडून आलेल्या सुट्‌ट्या आणि टाइमपास वन ला मिळालेलं यश या सगळ्याच गोष्टी टाईमपास -2 च्या ओपनिंग

शोजसाठी महत्त्वाच्या ठरतायत. मुंबईत बहुसंख्य ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकलेत. तर लास्ट मिनिट ऑनलाईन बुकिंग पाहू इच्छिणार्‍यांची ही हाऊसफुल्ल बघून निराशा होतेय. आतापर्यंतच हाययेस्ट ओपनिंग हा सिनेम मिळवेल असं जाणकारांचं म्हणणं आहे सुरवातीला टाईमपास टू चे दहा हजार शो सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्समध्ये लागलेत. त्यामुळे टाईमपास -2 चा ओपनिंगचा आकडा या सर्वाधिक असेल असा जाणकारांचा अंदाज आहे. जाणकारांचे आकडे मोडीत काढत पहिल्याच दिवशी टाइमपास 2 ने तीन कोटी ऐंशी लाख एवढी घसघशीत कमाई केलेली आहे. पहिल्या टाईमपासने 30 कोटींचा गल्ला कमवला होता. त्यामुळे पहिल्या टाईमपासचा विक्रम हा दुसरा टाईमपास मोडेल का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.

Follow @ibnlokmattv

First published: May 2, 2015, 9:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading