पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर

पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर

  • Share this:

sambhaji briged02 मे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झालीये. संभाजी ब्रिगेडतर्फे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येतंय. पुणे आणि औरंगाबादमध्ये जोडे मारा आंदोलन केलंय.

पुण्यातल्या आंबडेकर पुतळ्याजवळ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या बॅनरवरच्या फोटोला जोडे मारा आंदोलन केलं. तर औरंगाबादेत क्रांती चौकात आंदोलन करण्यात आलं.

जर सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार मागे घेतला नाही, तर आमदार आणि मंत्र्यांच्या गाड्या फोडू, रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय.

तसंच हा पुरस्कार परत नाही घेतला तर राज्यातील आमदारांना घेराव घालण्यात येईल आणि तीव्र आंदोलनाच इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिलाय. मात्र, बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय निवड समितीचा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

First published: May 2, 2015, 9:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading