धक्कादायक, कर्नलकडून गतिमंद मुलीवर बलात्कार

धक्कादायक, कर्नलकडून गतिमंद मुलीवर बलात्कार

  • Share this:

nashik sahani02 मे : सीमेवर आपल्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणार्‍या जवानाच्या शौर्याला काळीमा फासलीये. नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरात कर्नल विनोद सहानी यानं एका 22 वर्षाच्या गतिमंद मुलीवर बलात्कार केलाय. सहानीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

देवळाली कॅम्प इथल्या संसारी लेन परिसरात कर्नल विनोद सहानी याच्या घराजवळ ही मुलगी राहते. घरात मुलीची आई नसल्याचा फायदा घेत कर्नल सहनीने मुलीच्या घरात शिरुन या गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याचं मुलीच्या आई ने फिर्यादित म्हटलंय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. असून देशाचे संरक्षणाची जबाबदारी जांच्यावर आहे त्यांनीच आशा प्रकारचे कृत्य केल्यान संताप व्यक्त केला जातोय. या बाबत देवळाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2015 02:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading