नेपाळ भूकंपाला आठवडा पूर्ण, मृतांची संख्या 6,621 वर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 2, 2015 01:22 PM IST

APTOPIX Nepal Earthquake02 मे : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाला आज आठवडा पूर्ण होतोय. गेल्या शनिवारी झालेल्या या विनाशकारी भूकंपामुळे नेपाळची पुरती वाताहत झालीय. भूकंपातल्या बळींचा आकडा 6 हजार 621 वर पोचलेला आहे. तर आठवडा उलटल्याने आता ढिगार्‍यातून कोणी जिवंत सापडण्याची आशाही मावळत चाललीय.

भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल आणि अतिरिक्त मुख्य सचिव पी. के. मिश्रा भारतीय बचावकार्यावर लक्ष ठेवण्यासाठी काठमांडूमध्ये आहेत. मृतांचा आकडा 15 हजारांवर जाण्याची भीती आहे, तर अजूनही 1 हजार युरोपियन नागरिकांचा थांगपत्ता लागला नसल्याचं युरोपियन युनियनच्या राजदूतांनी म्हटलंय. पण नेपाळच्या अनेक दुर्गम भागांमध्ये अजूनही मदत पोहोचण्याची प्रतिक्षा होतेय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2015 01:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...