बाबासाहेबांना पुरस्कार द्यायला इतकी वर्षं का लागली?-राज ठाकरे

बाबासाहेबांना पुरस्कार द्यायला इतकी वर्षं का लागली?-राज ठाकरे

  • Share this:

raj thackarey on babasaheb01 मे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना उशिरा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. सैफ अली खान सारखा अभिनेत्याला पद्मश्री दिला जातो पण, बाबासाहेबांच्या कार्याची दखल सुद्धा या सरकारला घेता येत नाही ही शर्मेची बाब आहे अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

महाराष्ट्र दिनानिमित्ताने मुंबईच्या हुतात्मा चौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकात शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी बाबासाहेबांना उशिरा पुरस्कार देण्यावरून नाराजी व्यक्त केली.

बाबासाहेबांना पुरस्कार दिला ही गोष्ट चांगली झाली. त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करतो. पण, बाबासाहेबांचं वय वर्ष 93 आहे. इतक्या वर्षांत सरकारला कळलं नाही का ?, बाबासाहेबांनी ज्या खस्ता खाल्या, छत्रपती शिवरायांना ज्या माणसाने आपल्या व्याख्यानातून, पुस्तकातून घरांघरापर्यंत पोहचवण्याचा कार्य केलं. त्यांचं हे कार्य इतकी वर्ष राज्य सरकारला कळलं नाही का ? अशी तीव्र नाराजी राज यांनी व्यक्त केली.

तसंच मला या गोष्टीची शर्म वाटते. इतक्या वर्षांत बाबासाहेबांना पद्मश्री सुद्धा देण्यात आला नाही. आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने याची तसदी सुद्धा घेतली नाही. सैफ अली खानला पद्मश्री दिला गेलाय. हेच नाहीतर या यादीत काही नाव तर हास्यास्पद आहे. बाबासाहेबांच्या कार्याचं योगदान तुम्हाला समजलं नाही का ? असा सवालही राज यांनी राज्य सरकारला विचारला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2015 03:42 PM IST

ताज्या बातम्या