भूकंपामध्ये मृतांची संख्या 15 हजारांवर, नेपाळ लष्करप्रमुखांचा दावा

भूकंपामध्ये मृतांची संख्या 15 हजारांवर, नेपाळ लष्करप्रमुखांचा दावा

  • Share this:

A woman carries belongings as she walks over collapsed house after earthquake in Bhaktapur01 मे : नेपाळमध्ये भूकंपातल्या बळींची संख्या 6 हजार 200 वर पोहोचलीय. तर 14 हजारांपेक्षा जास्त जण जखमी आहेत. आतापर्यंत संपर्कयंत्रणांपासून पुरत्या तुटलेल्या दुर्गम भागांध्येही आता बचावपथकं पोहोचलेली आहेत. त्यामुळेच मृतांची संख्या वाढून 15 हजारांपर्यंत जाण्याची भीती नेपाळच्या लष्कर प्रमुख गौरव राणा यांनी व्यक्त केलीय.

25 एप्रिलचा दिवस नेपाळकरांसाठी काळा दिवस ठरलाय. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाने नेपाळाला मोठा हादरा बसलाय. नेपाळमध्ये आतापर्यंतचा हा सर्वात मोठा भूकंप आहे. या भूकंपात राजधानी काठमांडू जमीनदोस्त झालीये. लाखो लोकं बेघर झाले आहे. कोट्यावधीच्या मालमत्तेचं नुकसान झालंय. भारताने तातडीने मदत पोहचवलीये. या मदतीला ऑपरेशन मैत्री असं नाव देण्यात आलंय. भारताचं लष्कर, एनडीआरएफची टीम बचावकार्य करत आहे. भूकंपात मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील 1,19,384 जवान बचावकार्यात गुंतले आहे. मात्र, भूकंपामुळे झालेल्या नुकसानामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंतराष्ट्रीय मीडियाच्या दाव्यानुसार नेपाळचे लष्करप्रमुख गौरव राणा यांनी आमची शक्यता चुकीची ठरत आहे. मृतांची संख्या 15 हजारापर्यंत वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केलीये. तसंच स्थानिकांमध्ये काही प्रमाणात असंतोष असल्याचंही त्यांनी मान्य केलंय तर आता साथीचे आजार पसरण्याची भीती असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल भारतीय बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी काठमांडूमध्ये दाखल झाले आहेत.

विद्यापीठात पुस्तकांची नासधूस

दरम्यान, भूकंपामुळे नेपाळच्या काठमांडू विद्यापीठाच्या इमारतीला तडे गेले आहेत. ग्रंथालयातल्या पुस्तकांचीही नासधूस झालीय. या सगळ्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झालाय. या विद्यार्थ्यांचा अभ्यास काही काळ बंद ठेवण्यात आलाय. विद्यापीठाच्या इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी आता किमान 3 महिन्यांचा कालावधी जाईल, अशी शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

First published: May 1, 2015, 2:36 PM IST

ताज्या बातम्या