मलालावर हल्ला करणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा

मलालावर हल्ला करणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा

  • Share this:

malala_yousafzai30 एप्रिल : नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफजई हिच्यावर हल्ला करणार्‍या हल्लेखोरांना अखेर शिक्षा ठोठावण्यात आलीये. या हल्लेखोरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्वात प्रांतातील दहशतवादविरोधी न्यायालयानं ही शिक्षा ठोठावली आहे.

 2012 मध्ये मिंगोरा गावात शाळेतून परत येत असतांना मलालावर तालिबान्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्यात मलाला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर मलालावर लंडनमध्ये उपचार करण्यात आले, त्यात ती बचावली. या हल्याची जबाबदारी तेहरिके तालिबानं या दहशतवादी संघटनेनं स्विकारली होती. तिच्या या धाडसामुळे जगभरातून मलालावर कौतूकाचा वर्षाव झाला होता. 2014 चं शांततेचा नोबेल पुरस्कार ही मलाला विभागून देण्यात आला.

Follow @ibnlokmattv

First published: April 30, 2015, 7:19 PM IST

ताज्या बातम्या