कसा होता राहुल गांधींचा दौरा वाचा इथं...

कसा होता राहुल गांधींचा दौरा वाचा इथं...

  • Share this:

rahul gandhi444434330 एप्रिल : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपला नियोजित विदर्भाचा दौरा पूर्ण केला. पण हा दौरा विदर्भाच्या कडाक्याच्या उन्हात पार पडला. विदर्भात सध्या 42 अंश सेल्सियस इतकं तापमान आहे. अशा तापमानात राहुल गांधी यांनी 14 किलोमिटरचा पायी प्रवास केला. या प्रवासात अनेक गावांना त्यांनी भेटी दिल्यात. लोकांनीही उत्सफूर्तपणे राहुल यांची भेट घेऊन आपल्या समस्येचा पाढा वाचला. त्यांचा हा दौरा कसा होता त्याचीही तपशील....

- 42 अंश सेल्सियस तापमानात 14 किमी पदयात्रा

- आत्महत्या केलेल्या 10 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांची भेट आणि संवाद

- प्रत्येक शेतकर्‍याच्या कुटुंबीयांसोबत 10 ते 15 मिनिटं चर्चा

- एकूण 330 किलोमीटर प्रवास

- दौर्‍याचा तपशील

- स. 8 - गुंजी इथं आगमन, निलेश वाळके आणि अंबादास वाहिले यांच्या कुटुंबीयांची भेट

- स. 8.30 - गुंजी ते शहापूर 4 किमी पदयात्रेला सुरुवात

- स. 10 - शहापूरला आगमन, किशोर कांबळे यांच्या कुटुंबीयांची भेट

- शहापूरमध्ये विश्रांती आणि दुपारचं जेवण

- दु. 12.30 - शहापूर ते रामगाव 8 किमी पदयात्रेला सुरुवात

- दु. 1.30 - रामगावमध्ये आगमन, कचरू तुपसुंदरे यांच्या कुटुंबीयांची भेट

- दु. 2.30 - रामगाव ते राजना 13 किमी अंतर गाडीनं प्रवास

- दु. 2.45 - राजनामध्ये दाखल, मारोतराव नेवारे यांच्या कुटुंबीयांची भेट

- दु. 3.30 - टोंगलाबादला भेट, थोड्या विश्रांतीनंतर पत्रकार परिषद

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2015 07:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading