राज्यातील तापमानाचा पारा चढला, विदर्भात पारा 40 अंशांवर!

राज्यातील तापमानाचा पारा चढला, विदर्भात पारा 40 अंशांवर!

  • Share this:

temperature

30  एप्रिल : राज्यात तापमानाचा पारा गेले काही दिवस चढलेला आहे. विदर्भामध्ये सगळ्यात जास्त उष्णता आहे. सर्वात जास्त तापमान नोंदवण्यात आलंय चंद्रपूरमध्ये तर महाबळेश्वर राज्यात सगळ्यात थंड आहे.

वर्ध्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून तापमान वाढलेलं आहे. गारपिटीनंतर वातावरणात अचानक बदल होऊन ऊन तापायला लागलं आहे. पारा 44 अंशांपर्यंत पोहोचायला लागला असून परिणामी रस्ते ओस पडायला लागले आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ होतं आहे.

मराठवाड्यात ऊन तापायला लागलं आहे. परभणीचं तापमान 43 अंश सेल्सियवर पोहोच्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत. परभणीसह हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद या शहरांचंही तापमान मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. परभणीमध्ये सकाळी 11 वाजताच मुख्य रस्ते, बाजारपेठा सामसूम होत आहेत. याचा छोट्यामोठ्या व्यापार्‍यांवरही परिणाम होतं आहे. उन्हापासून वाचवण्यासाठी लोक डोकं आणि चेहरा रुमालानं बांधून घेताहेत. लातूर जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढला असून 41.5 अंश सेल्सियवर गेला आहे, तर निलंगा तालुक्यातल्या औरादचा पारा पहिल्यांदाचं 42. 5 अंशावर पोहोचला आहे.

राज्यात उन्हाचा कडाका

चंद्रपूर - 45.1

नागपूर - 43.9

अकोला - 42

बुलडाणा- 40.2

वर्धा - 44

यवतमाळ - 41.5

पुणे - 39

कोल्हापूर - 36.3

नाशिक - 38.7

औरंगाबाद - 41.2

परभणी - 42.4

लातूर - 41.5

मुंबई - 34.7

Follow @ibnlokmattv

First published: April 30, 2015, 2:45 PM IST

ताज्या बातम्या