हे सरकार शेतकर्‍यांचं नसून उद्योगपतींचंच -राहुल गांधी

 हे सरकार शेतकर्‍यांचं नसून उद्योगपतींचंच -राहुल गांधी

  • Share this:

BRKING940_201504300930_940x355 30 एप्रिल :शेतकर्‍यांची स्थिती बिकट असून केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करतंय. हे सरकार शेतकर्‍यांचं नसून उद्योगपतींचं आहे अशी परखड टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तसंच राहुल यांनी शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी अशी मागणी केलीये. राहुल गांधी यांनी आपला एक दिवसीय विदर्भाचा दौरा कडाक्याच्या उन्हात पूर्ण केला.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विदर्भाचा दौरा केला. त्यांनी अमरावती जिल्ह्यात 42 डिग्री तापमानात जवळपास 14 किलोमीटरची पदयात्रा केली. सकाळी गुंजी गावापासून ते शहापूर असा 4 किलोमीटरचा टप्पा त्यांनी पार केला. त्यानंतर विश्रांती घेवून पुन्हा शहापूर ते रामगाव असा 8 किलोमीटर पायी प्रवास केला. आत्महत्या झालेल्या 10 शेतकरी कुंटुबियांची भेट घेतली. सकाळपासून त्यांनी अनेक गावांना भेट दिली. पदयात्रेचा शेवट टोंगलाबाद इथं झाला. टोंगलाबाद इथं त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळलंय. पण केंद्रासह राज्यसरकारला याचं काहीही घेणं देणं नाही. शेतकर्‍यांना कर्ज माफी पाहिजे, मालाला योग्य भाव मिळत नाही. अशा बिकट परिस्थिती सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी उभं राहत नाही.हे सरकार फक्त उद्योगपतींचं आहे अशी टीका राहुल यांनी केली. तसंच शेतकर्‍यांनी धीर धरावा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. शेतकर्‍यांसाठी लढा कायम सुरू ठेवणार असंही राहुल म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल यांच्या पदयात्रेवर सडकून टीका केलीय. 15 वर्षांनी त्यांना आता जाग आली असेल, तर मी याचं स्वागतच करतो, असं फडणवीस म्हणाले.

राहुल गांधी यांच्या दौर्‍याची वैशिष्ट्यं

- 42 अंश सेल्सियस तापमानात 14 किमी पदयात्रा

- आत्महत्या केलेल्या 10 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांची भेट आणि संवाद

- प्रत्येक शेतकर्‍याच्या कुटुंबीयांसोबत 10 ते 15 मिनिटं चर्चा

- एकूण 330 किलोमीटर प्रवास

- दौर्‍याचा तपशील

- स. 8 - गुंजी इथं आगमन, निलेश वाळके आणि अंबादास वाहिले यांच्या कुटुंबीयांची भेट

- स. 8.30 - गुंजी ते शहापूर 4 किमी पदयात्रेला सुरुवात

- स. 10 - शहापूरला आगमन, किशोर कांबळे यांच्या कुटुंबीयांची भेट

- शहापूरमध्ये विश्रांती आणि दुपारचं जेवण

- दु. 12.30 - शहापूर ते रामगाव 8 किमी पदयात्रेला सुरुवात

- दु. 1.30 - रामगावमध्ये आगमन, कचरू तुपसुंदरे यांच्या कुटुंबीयांची भेट

- दु. 2.30 - रामगाव ते राजना 13 किमी अंतर गाडीनं प्रवास

- दु. 2.45 - राजनामध्ये दाखल, मारोतराव नेवारे यांच्या कुटुंबीयांची भेट

- दु. 3.30 - टोंगलाबादला भेट, थोड्या विश्रांतीनंतर पत्रकार परिषद

Follow @ibnlokmattv

First Published: Apr 30, 2015 04:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading