गोवंश हत्या बंदी कायद्याला स्थगिती नाहीच !

गोवंश हत्या बंदी कायद्याला स्थगिती नाहीच !

  • Share this:

COW4354329 एप्रिल : मुंबई हायकोर्टाने गोवंश हत्या बंदी कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिलाय. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळालाय. पण पुढचे तीन महिने या कायद्यांतर्गंत कोणतीही कारवाई करता येणार नाही असंही हायकोर्टाने म्हटलंय. हायकोर्टाने राज्य सरकारला या प्रकरणी चार आठवड्यांच्या कालावधीत तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलंय. यासंदर्भातल्या याचिकेची पुढची सुनावणी 21जूनला होणार आहे.

तब्बल 19 वर्ष प्रलंबित असलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याला 3 मार्च रोजी राज सरकारने हिरवा कंदील दिला. या कायद्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना अनुमती कळवलीय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कायद्यासाठी पाठपुरावा केला. महाराष्ट्र प्राणीरक्षण (दुरुस्ती) विधेयक असं या कायद्याचं नाव आहे. युती सरकारच्या काळात हे बिल पास झालं होतं. पण, 1995 आघाडी सरकारच्या काळात ते रखडलं होतं. अखेर राष्ट्रपतींनी मंजुरी देताच कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे गाय आणि वासरांच्या हत्येवर बंदी येणार आली आहे. याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टानेही याला स्थगिती देण्यास नकार दिलाय.

Follow @ibnlokmattv

First published: April 29, 2015, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading