राहुल गांधींच्या दौर्‍यानिमित्त रस्ते होतायत चकाचक

राहुल गांधींच्या दौर्‍यानिमित्त रस्ते होतायत चकाचक

  • Share this:

amravati_road29 एप्रिल : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी विदर्भ दौर्‍यासाठी आज (बुधवारी) रात्री नागपूरला येत आहेत. उद्यापासून ते विदर्भाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. अमरावतीपासून त्यांचा हा दौरा सुरू होतोय. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांचं काम सुद्धा सुरू झालंय. जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या गुंजी, शहापूरपासून राहुल यांचा दौरा सुरू होतोय. या दौर्‍याबद्दल गावकर्‍यांमध्ये उत्सुकता आहे, तसंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचीही तयारी सुरू आहे.

अमरावती जिल्ह्याच्या या दौरा करिता गावात मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुद्धा सुरू आहे . अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी, शहापूरपासून राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर चांदूर रेल्वे तालुक्यातील टोंगलाबाद, रामगाव आणि रांजणा गावाचा दौरा करतील. राहुल गांधी यांचा एकूण दौरा 175 किमीचा असेल, त्यातील 15 किमी ते पदयात्रा करणार आहेत आणि उर्वरित दौरा कारने करणार आहे. भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशमध्ये मोदींवर टीकास्त्र डागलं होतं. आता विदर्भाच्या दौर्‍यावर राहुल गांधी काय भूमिका घेतायत हे पाहाणं औत्सुक्याचं असेल. 59 दिवसांच्या विपश्यनेनंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असेल.

विशेष म्हणजे, या दौर्‍यामध्ये राहुल गांधी शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. गुंजी इथं ते आत्महत्या केलेल्या 2 शेतकर्‍यांच्या कुटुंबांची भेट घेणार आहेत. अंबादास वाहिले आणि निलेश भारत वाळके यांच्या कुटुंबाची ते भेट घेणार आहेत. या दोन्ही शेतकर्‍यांनी सततची नापिकी, दुबार पेरणी आणि बँकेचं कर्ज यांना कंटाळून फेब्रुवारीमध्ये आत्महत्या केली होती.

Follow @ibnlokmattv

First Published: Apr 29, 2015 06:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading