'श्री-जान्हवी'चा खर्‍या आयुष्यातही घटस्फोट ?

'श्री-जान्हवी'चा खर्‍या आयुष्यातही घटस्फोट ?

  • Share this:

shree jahnvi9

29  एप्रिल : होणार सून मी या घरची' या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या 'श्री' आणि 'जान्हवी' यांच्या खर्‍या आयुष्यातदेखील वादळ आले असून, श्रीची भूमिका करीत असलेला अभिनेता शशांक केतकर याने मालिकेप्रमाणेच खर्‍या आयुष्यातही आपली पत्नी तेजश्री प्रधान-केतकरपासून घटस्फोट मिळावा, यासाठी पुण्यातील फॅमिली कोर्टात 18 एप्रिलला अर्ज दाखल केला आहे.

शशांक आणि तेजश्रीचं पुण्यात आठ फेब्रुवारी 2014ला लग्न झालं. त्यावेळी ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली असल्यामुळे त्यांच्या विवाहाची चर्चाही पुष्कळ झाली होती. विवाहाच्या वर्षपूर्तीदरम्यान त्यांच्या खर्‍या आयुष्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सोशल नेटवर्किंग साइट्सवर रंगू लागली. त्याच वेळी मालिकेमध्येही त्यांच्यात दुरावा आल्याचे कथानक सुरू होते. ते दोघे घटस्फोटाचा दावा दाखल करण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे मालिकेत दाखवण्यात येत होते. त्यामुळे त्यांच्या खर्‍या आयुष्यातील दुरावा हा कदाचित प्रसिद्धीचा स्टंट असावा, अशी मालिकेच्या प्रेक्षकांची समजूत झाली होती; मात्र हा स्टंट नसून त्यांच्यात एका वर्षातच खरंच कटुता निर्माण झाल्याचे प्रकाशात आलं आहे.

विवाह पुण्यात झाल्यामुळे घटस्फोटासाठीचा अर्ज पुण्यातील फॅमिली कोर्टात दाखल झाला आहे. शशांकने घटस्फोटाची मागणी करताना व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यातील प्रसंगांचे दाखले दिले आहेत.

Follow @ibnlokmattv

First Published: Apr 29, 2015 02:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading