नेपाळमध्ये मृतांची संख्या 5 हजारांवर

नेपाळमध्ये मृतांची संख्या 5 हजारांवर

  • Share this:

Man sits on the rubble of his damaged house following Saturday's earthquake in Bhaktapur, Nepal28 एप्रिल : नेपाळच्या भूकंपाला 72 तास उलटले आहेत. भूकंपातल्या बळींची संख्या 5 हजार 57 वर पोहोचलीय. तर या भूकंपातल्या बळींची संख्या 10 हजारांपर्यंत जाण्याची भीती नेपाळच्या पंतप्रधानांनी रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केलीय.

मदतकार्य अधिक वेगाने करण्याचे आदेश नेपाळच्या पंतप्रधानांनी दिले आहेत. तर 8000 जण जखमी आहेत. नेपाळमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. आतार्यंत 2,865 भारतीयांची सुटका करण्यात आलीय.यूएनच्या सर्वेक्षणानुसार 80 लाख लोकांना मदतीची गरज आहे. भूकंपाला 72 तास उलटले असले तरी अजूनही अनेक लोक इमारतींच्या ढिगार्‍यांखाली अडकलेले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता ढिगार्‍या खाली अडकलेल्यांची सुटका करण्याचं धडपड सुरू आहे.

बचावकार्यात अडथळे

नेपाळमधल्या बचावकार्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे अख्खा देश हा डोंगराळ आहे. डोंगर, टेकड्या, दर्‍या या देशात अनेक आहेत. त्यामुळे विमानं आणि हेलिकॉप्टरला पर्याय नाही. भारतीय वायूदलानं अनेक लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्स नेपाळमध्ये पाठवली आहेत. त्यातून गंभीर जखमींना प्राधान्य देऊन बेस कॅम्पवर आणलं जातंय. तिथून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं जातंय.

समस्या अशी आहे की हवामानही फार अनुकूल नाही. दुसरं म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये जागा सीमित असते. जास्त वजन घेऊन उडता येत नाही. इंधन कमी भरू म्हटलं तर तेही शक्य नाही, कारण आणीबाणीची परिस्थिती आली तर पुन्हा बेस कॅम्पवर जाण्याइतकं इंधन ठेवावं लागतं.

Follow @ibnlokmattv

First published: April 28, 2015, 11:41 PM IST

ताज्या बातम्या