नागपूर जेलमध्ये कैद्याची हिरोगिरी, जेलमध्येच केलं फोटोसेशन !

नागपूर जेलमध्ये कैद्याची हिरोगिरी, जेलमध्येच केलं फोटोसेशन !

  • Share this:

nagpur jail28 एप्रिल : कैदी फरार झाल्याने बदनाम झालेल्या नागपूर सेंट्रल जेलमधल्या कैद्यांचा आणखी एक कारनामा बाहेर आलाय. राजा गौस या गुंडाने चक्क जेलमध्येच फोटोसेशन केलंय तेही आपल्याकडच्या स्मार्टफोनद्वारे....राजाच्या गौसच्या मोबाईलचं मेमरी कार्डचं आयबीएन लोकमतच्या हाती आलंय. विश्वास बसत नाही ना...मग जरा हे फोटो जरा बघा..हे बघा गौसचे बराक नंबर 6मधले हे स्टाईलिश फोटोज्....

राजा गौस हा नागपुरातला एक कुख्यात गुंड असून तो सख्या सेंट्रल जेलच्या बराक नंबर 6 मध्ये कैद आहे. तरीही त्याने जेलमध्येच स्वतःचे सेल्फी काढलेत ते ही स्वतःच्या मोबाईलमधून....एवढंच नाहीतर याच जेलमधून तो मोबाईलद्वारे व्यावसायिकांना धमक्या देऊन खंडनी वसूल करत असतो. आपल्या मित्रांना केलेल्या एसएमएसद्वारे राजाने जेलमधून पळून जाण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहितीही समोर आलीये. त्यामुळे जेल प्रशासनाचा भ्रष्टाचारी चेहरा पुन्हा चव्हाट्यावर आलाय, कारण जेलमधल्या पोलिसांशी लागेबांधे  असल्याशिवाय राजा गौस जेलमध्ये हे असं स्टाईलिश मोबाईल फोटोसेशन करूच शकत नाही.

धक्कादायक म्हणले, राजा गौस याने पळून जाण्याचा कट गौसच्या मोबाईलमधून सापडलेल्या मेमरी कार्ड मधून बाहेर आला आहे. 31 मार्चला नागपूर सेंट्रल जेलमधून राजा गौसचे तीन साथीदार आणि दोन इतर आरोपी कारागृहाचे गज कापून फरार झाले होते. जे गज या आरोपींनी कापले ते राजा गौसच्या मोबाईलमधील फोटो मध्ये दिसत आहे. राजा गौसने कारागृहातून पळून जाण्यासाठी पूर्ण तयारी केली. आपल्या साथीदारांना मेसेजही पाठवले आणि चेतावणीही दिली.

कोण आहे राजा गौस

- राजा गौस नागपूरचा कुख्यात गुंड

- नागपूर परिसरात गँग चालवतो

- त्याच्यावर खंडणी, खून, मारहाण प्रकारचे 15 गुन्हे दाखल

- नागपूर जेलमधील अंडा सेलमध्ये बंदिस्त

- फरार झालेल्या 5 पैकी तीन कैदी राजा गौस यांच्या गँगचे

- पाय फॅक्चर झाल्यामुळे पळून जाण्यात अयशस्वी

- जेलमधून गुन्हेगारी नेटवर्क चालवतो

Follow @ibnlokmattv

First published: April 28, 2015, 9:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading