28 एप्रिल : मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखवण्याच्या निर्णयाविरोधात ट्विट करणार्या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला असून राज्य सरकारनं बजावलेल्या नोटिसीला स्थगिती दिली आहे. तसंच, शोभा डे यांनी केलेल्या ट्विटमुळे विधानसभेचा अवमान कसा झाला? असा उलट सवालही सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला केला आहे.
प्राईम टाईमला मराठी चित्रपट दाखवणे अनिवार्य करण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखवण्याच्या निर्णयाला विरोध करत शोभा डे यांनी ट्विटरवरून फडणवीस सरकार हुकुमशहा प्रवृत्तीचे असल्याचं ट्विट केलं होतं. विधानसभेत लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेऊन हक्कभंग प्रस्ताव सादर केला. तसंच डे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी देखील केली होती.
दरम्यान, डे यांनी या नोटीशीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर कोर्टाने या प्रस्तावाला स्थगिती दिली.
Follow @ibnlokmattv |