नेपाळमध्ये रस्ते पुन्हा बांधण्यासाठी मदत करणार -गडकरी

नेपाळमध्ये रस्ते पुन्हा बांधण्यासाठी मदत करणार -गडकरी

  • Share this:

gadkari__on_cm26 एप्रिल : नेपाळमधील भुकंपामुळे उद्द्धस्त झालेले रस्ते पुन्हा बांधण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय नेपाळला मदत करणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय.

नेपाळवरील संकट हे भारतावरील आहे आणि सर्व खात्यांच्या मंत्र्यांनी नेपाळला भूकंप पुर्नवसनासाठी मदत करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलंय. केंद्र सरकारचे सर्व विभाग आपापल्या परीने नेपाळला मदत करणार आहे. महाराष्ट्रातील जे लोक नेपाळमध्ये अडकले आहे त्यांना परत आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र विभागाना विनंती केल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

First published: April 26, 2015, 9:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading