नेपाळमध्ये भूकंपातील बळींची संख्या 10 हजारांवर?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2015 11:43 PM IST

 नेपाळमध्ये भूकंपातील बळींची संख्या 10 हजारांवर?

nepal 28 1

28 एप्रिल : नेपाळमधील भूकंपातील बळींची संख्या 10 हजारांवर जाण्याची भीती नेपाळच्या पंतप्रधान सुशील कोईराला यांनी रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केली आहे. तसंच मदतकार्य अधिक वेगाने करण्याचे आदेशही त्यांनी दिली आहे. आतापर्यंत 5,057  जणांचा बळी गेला असून 8 हजार पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले आहेत. नेपाळच्या भूकंपाला 72 तास उलटले असले तरी अजूनही अनेक लोक इमारतींच्या ढिगार्‍यांखाली अडकलेले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता ढिगार्‍या खाली अडकलेल्यांची सुटका करण्याचं धडपड सुरू आहे. दरम्यान काठमांडूमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बचावकार्यात पुन्हा एकादा अडथळा निर्माण झाला आहे.

नेपाळमधल्या बचावकार्यात सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे अख्खा देश हा डोंगराळ आहे. डोंगर, टेकड्या, दर्‍यांच्या कुशीत या देशाचं वास्तव्य आहे. त्यामुळे विमाने आणि हेलिकॉप्टरला पर्याय नाही. भारतीय वायूदलाने अनेक लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्स नेपाळमध्ये पाठवली आहे. पण त्यातून गंभीर जखमींना प्राधान्य देऊन बेस कॅम्पवर आणलं जातं आहे. तिथून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं जातं आहे.

दरम्यान, काठमांडूत अनेक ठिकाणी अन्न आणि औषधांचं वाटप सुरू आहे. विविध देशातून आलेली पथकं आणि सेवाभावी संस्था युद्ध पातळीवर स्थानिकांना मदत करत आहेत. काठमांडू वगळता अन्य भागांमध्ये जाण्यासाठी रस्ते सुस्थितीत नसल्याने तिथे वाहतूक कोंडी होत आहे. म्हणून तिथपर्यंत ही मदत सामुग्री घेऊन पोहचवणं कठीण झालं आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2015 02:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...